बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् यशपाल शर्माने मद्रासचा राग मँचेस्टरमध्ये काढला, पाहा व्हिडीओ

मुंबई | 1983 चा वर्ल्ड कप (83 World Cup) हा भारतीय क्रिकेट जगताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहलेलं पान आहे. या वर्ल्ड कपने भारतीय क्रिकेटचं चित्र बदलून टाकलं होतं. कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला होता. त्या वर्ल्ड कपच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळणार आहे. या वर्ल्ड कपवर ’83’ नावाचा चित्रपट येणार आहे.

सेमीफायनलच्या सामन्यात यशपाल शर्मा (Yashpal Sharma) मोहिंदर अमरनाथसोबत (Mohinder Amarnath) फलंदाजी करत असतानाची ही घटना आहे. दिवंगत यशपाल शर्मा त्यांच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखलं जात होते. त्या काळात अमरनाथ सिनियर खेळाडू असल्याने ते यशपालला सावधपणे फलंदाजी कर असे वारंवार सांगत होते.

यशपाल शर्मा सर्वांचे म्हणणे ऐकून घेत असत आणि क्रिझवर बसून आपल्या मनासारखे खेळायचे त्याचवेळी क्रिझवर तिन्ही स्टंप सोडून यशपाल यांनी लेग साईडला षटकार ठोकला. ते पाहून मोहिंदर अमरनाथ यांनी यशपाल जवळ जाऊन त्यांना पुन्हा समजावलं.

तेव्हा उत्तर देताना यशपाल शर्माने मोहिंदर अमरनाथना म्हणाले, ‘जिमी पाजी तुम्हाला माहीत नाही. या गोलंदाजाने मला मद्रासमध्ये शिवीगाळ केली. तेव्हा अमरनाथ म्हणले की, तू मद्रासचा बदला मँचेस्टरमध्ये घेशील का?, असा किस्सा मोहिंदर अमरनाथ यांनी सांगितला आहे. येत्या 24 तारखेला 83 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पाहा व्हि़डीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)


थोडक्यात बातम्या-

बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“राज साहेब माझं काय चुकलं?”, पुण्यापाठोपाठ औरंगाबाद मनसेमधील अस्वस्थता उघड

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवली

अजित पवारांच्या उपस्थितीत रूपाली पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘शीना बोरा जिवंत, काश्मीरमध्ये तपास करा’; इंद्राणी मुखर्जींच्या दाव्याने देश हादरलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More