Top News नाशिक महाराष्ट्र

अंथरुण पाहून पाय पसरावे; अनिता भामरेंचं पुनम महाजनांना प्रत्युत्तर

नाशिक | तुझ्यापेक्षा दुपटीने पवार साहेबांचे वय जास्त अंथरुण पाहून पाय पसरावे, असा घणाघात राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अनिता भामरेंनी पुनम महाजन यांच्यावर केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना पुनम महाजन यांनी काही दिवसांपूर्वी शकुनीमामाची उपमा दिली होती. त्यावर आक्रमक होऊन अनिता भामरेंनी पुनम यांना पत्राद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रमोद महाजन आणि शरद पवार हे चांगले मित्र होते. साहेबांचे राजकारणाव्यतिरिक्त अनेक मित्र आहेत. तुझ्या वयापेक्षा जास्त त्यांना राजकारणाचा आणि समाजकारणाचा अनुभव आहे, अशा शब्दात भामरेंनी त्यांना सुनावलं आहे. 

दरम्यान, प्रसिद्धीचा हव्यास करु नको. त्यापेक्षा कामांकडे लक्ष दे. पुन्हा अशी घोडचूक करु नको, नाहीतर वयाने मोठी म्हणून कानाखाली…., अशा भाषेत त्यांनी पुनम महाजन यांना सुनावले आहे. 

महत्वाच्या बातम्या-

दलालीच्या पैशातून लंडनमध्ये 8 फ्लॅट्सची खरेदी, भाजपचा प्रियांकांवर गंभीर आरोप

हार्दिक पटेल लोकसभा निवडणूक लढणार?

-“नरेंद्र मोदींना पत्नीसोबत पोस्टरवर झळकता येत नाही हे दुर्दैव”

-“गांधी, लोहिया, जेपींना माझे काका विसरले आणि भागवत, मोदी, शहांचे शिष्य झाले”

बीडमध्ये कार्यक्रम राष्ट्रवादीचा आणि घणाघाती भाषण मुख्यमंत्र्याचं! वाचा सर्व मुद्दे एकाच ठिकाणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या