“सीआयडीला जमत नसेल तर शिवाजी साटम यांच्याकडे तपास द्या”

Beed Crime

Beed Crime | बीड जिल्ह्यातील (Beed Crime) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) आणखी मोठे खुलासे झाले आहेत. राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात सुरुवात झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून केला जातोय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडच्या (Beed Crime) संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सीआयडी चौकशीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

9 ते 31 तारखेपर्यंत जे चाललं आहे ती धुळफेक आहे. पोलीस यंत्रणा शोधत नाही, सीआयडीला जमत नसेल तर शिवाजी साटम यांच्याकडे चौकशी द्यावी, असा उपरोधिक टोला अंजली दमानिया यांनी लगावला आहे.

‘सीआयडीला जमत नसेल तर…’

ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांची सीआयडी मालिका ही प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेत शिवाजी साटम हे सीआयडीचे प्रमुख आहेत. बीड प्रकरणाचा तपासावर सीआयडीकडून सुरु असलेल्या तपासावर भाष्य करताना हा तपास शिवाजी साटम यांच्याचकडे द्या, असा टोला अंजली दमानिया यांनी लगावला आहे.

मी काल गेले तेव्हा 3 मोटर सायकल्स लागल्या होत्या. धनंजय मुंडे, वाल्मिक कराडच्या कंपन्यांचे लोक होती. आम्ही त्यांच्या मागे लागलो तेव्हा ते पळून गेले. अभिनंदनाचे वर्षाव व्हायला लागले मात्र अभिनंदनासारखं त्यात काय होतं? 20-25 दिवस पोलिसांना एवढा वेळ का लागला?, असा सवालही त्यांनी केलाय.

Beed Crime | तपासला वेग येणार

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडलाही (Walmik Karad) पोलिसांनी अटक केलीआहे. तसेच, न्यायालयाने आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली असून संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणातील फरार आरोपींचाही शोध घेतला जात आहे

राज्य शासनाकडून संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात ही समिती स्थापन करण्यात आली असून तेली यांच्यासह 10 जणांची टीम या घटनेचा सखोल तपास करणार आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासला वेग येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

झटपट वजन कमी करण्यासाठी ‘ही’ गोष्ट ठरते फायदेशीर!

‘या’ कारणांमुळे वाल्मिक कराडला 15 दिवसाची कोठडी!, सरकारी वकिलांकडून गौप्यस्फोट

शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार? बड्या नेत्यानी केलं वक्तव्य

मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना गंभीर इशारा, म्हणाले…

वाल्मिक कराडच्या गुन्ह्यांची कुंडली आली समोर! 25 वर्षात तब्बल ‘इतके’ गुन्हे दाखल

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .