अजितदादांच्या ‘त्या’ गोष्टीवरून तळपायाची आग मस्तकात गेली; अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?

Ajit Pawar

Ajit Pawar l राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शापाठ घेतली आहे. मात्र शपथविधीनंतर अवघ्या काही तासांतच अजित पवारांना आयकर विभागाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्ता मुक्त केली आहे. मात्र या घटनेवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

नेमकं प्रकरण का? :

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांशी संबंधित असलेली मालमत्ता मुक्त केली आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया प्रचंड भडकल्या आहेत. यावेळी अंजली दमानिया म्हणल्या की, आज मी तुमच्या पुढे आली आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक हजार कोटीची त्यांची मालमत्ता आयकर विभागाने परत दिली आहे. मात्र यामुळे माझी तळपायाची आग मस्तकात गेली आहे. कारण हे चाललंय तरी काय? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

Ajit Pawar l अंजली दमानिया संतापल्या :

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, तुम्ही आधी त्यांच्या मागे ये डब्ल्यू लावणार त्यांच्या मागे सगळ्या यंत्राला लावणार, तसेच इन्कम टॅक्स रेड करणार? तसेच 2021 मध्ये जन्मेश्वर या साखर कारखान्यावर रेड झाली होती आणि त्यामध्ये फायर पॉवर नावाच्या कंपनीस जेवढ्या आहेत. परंतु, त्या सगळ्यांना माहिती आहेत की सुनेत्रा पवार अजित पवार यांनी सुरू केलेल्या कंपनी आहेत. त्यामधून सुनेत्रा पवार आणि अजित पवार बाहेर पडले आहेत. परंतु, आज तगायत हे त्यांच्या जवळचे नातेवाईक जे आहेत तेच या कंपन्या चालवतात असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

राज्यात शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, रुग्णांना न्यायला ॲम्बुलन्स नाहीत. तसेच मुलांना शाळेत जायला रस्ते देखील व्यवस्थित नाहीयेत. मात्र अशा परिस्थितीत ज्या महाराष्ट्रावर इतकं अफाट कर्ज झालं आहे. त्या महाराष्ट्रातले सगळे नेते अक्षरशः मजा करत आहेत. नंतर आता हे कुठेतरी हे सगळं थांबायला हवं असंही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

News Title – Anjali Damania on Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

उद्या मोठी घडामोड घडणार; महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार?

राजकीय महाभूकंप… महाविकास आघाडीतून ‘हा’ पक्ष बाहेर पडला

…म्हणून मविआच्या आमदारांनी शपथ घेतली नाही, आदित्य ठाकरेंनी केला खुलासा

भाजपचा आमदार बसला विरोधी बाकावर, पुढे काय घडलं?

बापरे! …असं न केल्यास शाळांवर होणार मोठी कारवाई

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .