“घर के ना घाट के अशी अजित पवारांची अवस्था”

मुंबई | आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. ना घर के ना घाट के अशी परिस्थिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची झाली आहे, असं अजली दमानिया यांनी म्हटलंय.

अजित पवार (Ajit Pawar) शांत बसतील, असं मला वाटत नाही. दिवाळीपर्यंत ते त्यांच्या आमदारांना एकत्र करतील. त्यानंतर मोठा दगाफटका करतील, यात काही शंका नाही. जो होतंय तो राजकारणाचा उकिरडा होतोय. अशी टीका अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर केली.

आता पुन्हा हाच घोडेबाजार 2024 आधी होईल. अक्षरशः घमासान होईल. पण लोकांना हे कळत कसं नाही. अशा राजकारण्यांना आपण का निवडून देतो, असा सवालही अंजली दमानिया यांनी केला.

शरद पवार यांनी सुप्रिया सुळे हे राष्ट्रीय पातळीवर बघतील आणि अजित पवार राज्य पातळीवर बघतील, असं त्यांना समजावलं आणि 2 मे रोजी भलतच केले. अजित पवार यांना कुठल्याही परिस्थितीत भाजपबरोबर जायचे होते. त्यासाठी त्यांनी हा सर्व प्लॅन रचला होता. पण तोंडघशी ते पडल्यासारखे झाले, असंही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More