कारागृहात भुजबळांना खास वागणूक, दमानियांच्या आरोपांची चौकशी होणार

मुंबई | माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना तुरुंगात खास वागणूक मिळत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. आता याप्रकरणी चौकशी होणार आहे. महाराष्ट्र कारागृह विभागाकडून यासंदर्भात आदेश देण्यात आलेत.

अंजली दमानिया यांनी अतिरिक्त कारागृह संचालक भूषणकुमार उपाध्याय यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात समीर आणि छगन भुजबळ कारागृहात चित्रपट पाहतात. तसेच त्यांना चिकन मसाला आणि नारळपाण्यातून दारुही पुरवली जाते, असा आरोप करण्यात आलाय.