महाराष्ट्र मुंबई

आता खैर नाही, मी खडसेंना कोर्टात खेचणार- अंजली दमानिया

मुंबई | आता खैर नाही न्यायालयात खेचणार, असं म्हणत अंजली दमानिया यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना इशारा दिला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

आज एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर मी भाजपासाठी चाळीस वर्षे दिली. या चाळीस वर्षांच्या बदल्यात मला काय मिळालं? एसीबीची चौकशी, भूखंड घोटाळ्याचे आरोप, विनयभंगाचे आरोप, बाई दिली नाही मागे लावली, असं खडसे म्हणाले. यावरून अंजली दमानिया यांनी खडसेंवर टीका केलीये.

हे उदगार ह्या खडसेंनी अख्या राष्ट्रवादी पार्टीच्या लोकांसमोर काढले आणि ह्याची एकालाही शरम आली नाही? की एका सुसंस्कृत स्त्री बद्दल हा काय बोलतोय?, असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलंय.

दरम्यान, या आधी अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आहे ज्यामध्ये जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“…म्हणून चंद्रकांत पाटील भाजपमध्ये आले”

पवार साहेब तुम्ही मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला हे बरं झालं, नाहीतर मी…- एकनाथ खडसे

आरारारारा खतरनाक!; चेन्नईच्या समर्थकांची आता काही खैर नाही

“राष्ट्रवादी नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देतं की कॅडबरी हे पाहावं लागेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या