बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पैसे खाल्ले तेव्हा नव्हता का कोरोना?, उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ”

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र त्यांनी ईडीच्या कार्यालयाला पत्र लिहित जबाब हा व्हिडीओ कॉन्फरन्सीगच्या माध्यमातून नोंदवण्यात यावा अशी विनंती केली.

मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय 72 वर्ष आहे, आजारपण आणि कोरोना होण्याच्या धोक्यामुळे हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाईन रेकॉर्ड करा, असं अनिल देशमुख म्हणाले. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनिल देशमुखांवर टीकास्त्र सोडलं आहे.

ED नं बिलकुल अपवाद करू नये. कायदा हा सर्वांसाठी समानत आहे. उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ. मग काय अर्थ यंत्रणेचा? भाजपची ही चाल आहे, पण तुमचे हाथ देखील बरबटलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय.

तुमची प्रतीमा स्वच्छ आहे, तुम्ही काही केलं नाही तर घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. तुम्हाला माहितीये तुम्ही जे केलंय ते चुकीचं केलंय. सध्या माध्यमांमधून जे समोर आलं जी आकडेवारी समोर आली, झोन 1 ते झोन 7 नं इतकं कलेक्शन केलं, झोन 8 ते झोन 12 ने इतकं कलेक्शन केलं, ते ऐकून राग येतो. मग कोरोना तुम्हाला आता आठवला, ज्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार केला तेव्हा कोरोना नाही का आठवला असं म्हणावंस वाटतं, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या- 

“पंजा फक्त टायगर जवळच असतो आणि टायगर काँग्रेसमय झालाय”

वाह! घरगुती गॅस सिलेंडरवर 900 रुपयांचा कॅशबॅक; ‘ही’ आहे भन्नाट ऑफर!

वारकऱ्यांनो आळंदीच्या वारीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा- बंडातात्या कराडकर

…म्हणून ट्विटरवर चाईल्ड पॉर्नोग्राफीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

औरंगाबादमधील ‘या’ आमदाराने भर चौकात केली बेशिस्त रिक्षाचालकाला मारहाण; पाहा व्हिडीओ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More