महाराष्ट्र मुंबई

“एकनाथ खडसे हे भ्रष्टाचारी आहेत, त्यांना आमदार करू नका”

मुंबई | एकनाथ खडसेंना राज्यपाल नियुक्त आमदार करु नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यपालांकडे केली आहे.

राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून विधान परिषदेवर खडसेंची राष्ट्रवादीतर्फे वर्णी लागण्याची चर्चा आहे. त्यांचं नाव आमदारकीसाठी निश्चित मानलं जात आहे. अशातच अंजली दमानिया यांनी खडसेंना राज्यपाल नियुक्त आमदार करु नये, अशी मागणी केलीये.

खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना वापरलेली भाषा या सर्व गोष्टींमुळे त्यांना आमदार करु नये, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीत प्रवेश करताना खडसेंनी माझ्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर मी स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून त्यांच्याकडे खडसेंबाबतची तक्रार केली होती. पण पवारांनी खडसे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, असा दावा दमानिया यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर

जेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन

“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”

‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला

…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या