महाराष्ट्र मुंबई

…तर बंदीसाठी 20 जवानांच्या बलिदानाची वाट पाहात होता का?- संजय राऊत

मुंबई | चिनी अ‍ॅप्सपासून धोका आहे हे आपल्याला आधी माहिती होतं तर या कंपन्या का सुरु होत्या? बंदीसाठी 20 जवानांच्या बलिदानाची वाट पाहात होता का?, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

चीनचं आर्थिक कंबरडं मोडावं ही सगळ्यांची भूमिका आहे. चीनच्या गुंतवणूकीबाबतही आर्थिक धोरण ठरवलं पाहिजे. अन्यथा पाकिस्तानसोबत जसे संबध जोपासले जातात तसंच होवू नये, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

चिनी अ‍ॅप्सवरील बंदीचं मी तुर्तास स्वागत करतो. पण तुमची गोडीगुलाबी झाल्यावर हा धोका नाही गुलाबजाम होता असं होवू नये, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला.

भारत-चीन सीमावाद हा विषय राजकीय धोरणात्मक आहे. याचे राजकारण होवू नये. सीमेवर आपले जवान समर्थ आहेत, असंही संजय राऊत म्हणाले .

ट्रेंडिंग बातम्या-

अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली अन्…..”

महत्वाच्या बातम्या-

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांचा आक्षेप, म्हणाले….

लडाखनंतर आता ‘या’ देशाच्या भूभागावर चीनने केला दावा

‘मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू’, कराचीतून फोन आल्याचा संशय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या