बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”ती’ खोली हेच स्वातंत्र्याचं खरं सत्य’; सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर कंगना भारावली

मुंबई | बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत सोशल मीडियावर सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. तसेच कंगना राणावत सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. अलिकडेच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे अजून ती परत चर्चत आली आहे आणि तिचा हा फोटो सध्या प्रंचड व्हायरल होत आहे.

कंगना राणावतने अलिकडेच अंदमानातील सेल्युलर जेलला भेट दिल्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्या पोस्टमध्ये तिने वीर सावरकर यांच्याविषयी लिहिलं आहे. वीर सावरकरांना कैदेत ज्या ठिकाणी ठेवलं होतं, त्या पोर्ट ब्लेअर सेल्युलरला मी आज भेट दिली. मी मनापासून हादरून गेले होते, जेव्हा अमानुषता शिगेला पोहोचली होती, तेव्हा खऱ्या अर्थाने सावरकरांच्या रूपाने मानवता शिखरावर पोहोचली आणि अमानुषतेचे भय न बाळगता नजरेला नजर भिडवत ते धैर्याने क्रुर शिक्षेला सामोरे गेले, प्रत्येक क्रुर कृत्याचा त्यांनी निर्धाराने विरोध केला, असं कंगनाने म्हटलं आहे.

ब्रिटिशांना सावरकरांची काळ्या पाण्याच्या शिक्षेवरून किती भीती वाटत असावी याची कल्पना आपल्याला येते. त्यांना लहानशा बेटातून पळून जाणे अशक्य होते, म्हणून त्यांना साखळदंडाने तुरूंगात ठेवलं होतं, अंस देखील कंगना रणावत म्हणाली आहे.

दरम्यान, अलिकडेच कंगना रणावतला पंगा आणि मणिकर्णिका चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार दाक्षिणात्या मेगास्टार शिवाजीराव गायकवाड अर्थातच रजनीकांत यांना देण्यात आला आहे.

पाहा पोस्ट-

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

थोडक्यात बातम्या- 

“राजकारण आता व्यापार झालाय, खऱ्याच्या बाजूने कोणीही बोलत नाही”

इम्रान खानच्या अडचणीत वाढ! पाकिस्तानमध्ये शिया आणि सुन्नी भिडले

पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देत किरण गोसावी लखनऊमधून फरार

मलिकांनी घेतली मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट; मुंबई पोलीस दलात हालचालींना वेग

“…म्हणून किशोरी पेडणेकर यांनी राजीनामा द्यावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More