‘बिग बॉस 15’ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर अंकिता लोखंडेनं सोडलं मौन, म्हणाली….
मुंबई | बिग बॉस सीझन 14 संपल्यापासून आता ‘बिग बॉस 15’ ची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळतेय. कोण स्पर्धक असणार काय टास्क असणार याबद्दल सोशल मीडियावर चर्चाही सुरू झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडेला ‘बिग बॉस’च्या 15व्या पर्वासाठी विचारणा करण्यात आल्याच्या चर्चा रंगत आहेत. या होणाऱ्या चर्चांवर अंकितानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
अंकिता लोखंडे ‘बिग बॉस 15’मध्ये झळकणार अशा चर्चा सुरु असतानाच स्वत: अंकिता लोखंडेने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अंकिता लोखंडेनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत ती ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
या पोस्टमध्ये अंकिता लिहिलं की, अनेक मीडिया रिपोर्टसमध्ये अशा बातम्या येऊ लागल्या आहेत की मी यावर्षी ‘बिग बॉस’ शोमध्ये सहभागी होणार आहे. मला वाटतं मीडिया आणि सर्वांनी हे नोट करावं की मी बिग बॉस या शोमध्ये सामील होणार नाही. या शोमध्ये मी सहभाग घेणार असल्याचं वृत्त खोटं आहे. मी अशा कोणत्याच गोष्टीचा भाग होणार नसतानाही लोकांनी लगेचच घाई करत मला द्वेषपूर्ण प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, रिया चक्रवर्तीसुद्धा या सीझनमध्ये येणार असल्याची चर्चा होती. अंकिता लोखंडे आणि रिया दोघींनीही अभिनेता सुशांत सिंहला डेट केलं होतं. सुशांतच्या मृत्यूनंतर दोघीही आमने सामने आल्या होत्या. अशा परिस्थितीत बिग बॉसच्या घरात दोन्ही अभिनेत्री एकत्र आल्या तर सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरू शकतो, असं चाहत्यांना वाटत होतं.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या –
62 वर्षीय व्यक्तीनं केली डेल्टा प्लस व्हेरिएंटवर मात, अनुभव सांगताना म्हणाला…
हिंदी चित्रपट अश्लिल, फाॅलो करणं बंद करा – इम्रान खान
नारदा स्टींग प्रकरणी ममता बॅनर्जींचं उच्च न्यायालयात नवीन प्रतिज्ञापत्र दाखल
Comments are closed.