मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूतला हे जग सोडून आज एक महिना पूर्ण झालाय. अजूनही त्याच्या चाहत्यांच्या मनातून सुशांतच्या आत्महत्येची दृश्य जात नाहीयेत. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने सुशांतच्या आठवणीत एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहीली आहे.
अंकिताने तिच्या इन्स्टाग्रावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक पेटता दिवा असून दिव्याच्या आजूबाजूला पांढऱ्या रंगाची फुलं मांडलेली दिसून येत आहेत. तिने या फोटोला ‘देवाचं मुल’ एवढंच कॅप्शन दिलं आहे.
सुशांतने आत्महत्या केली तेव्हा अंकितला खूप मोठा धक्का बसला होता. अनेक दिवस ती या धक्क्यातून सावरलेली नव्हती. सुशांतच्या आत्महत्येनंतर तिने राजपूत कुटुंबाची मुंबईमध्ये तसंच पाटन्यामध्ये जाऊन भेट घेतली घेतली होती.
सुशांत आणि अंकिताची पवित्र रिश्ता ही मालिका खूपच गाजली. या मालिकेवेळी त्यांची खूप छान मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. कालांतराने त्यांनी काही कारणांमुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतला. परंतू सुशांतच्या मनातून अंकिता काही केल्या जात नव्हती.
दरम्यान, सुशांत गेल्या वर्षभरापासून डिप्रेशनमध्ये होता. यावर मुंबईतल्या हिंदुजा रूग्णालयात तो उपचार देखील घेत होता. परंतू 14 जून रोजी त्याने आयुष्याला कंटाळत मृत्यूला जवळ केलं आणि या जगातून तो सर्वांना सोडून निघून गेला.
ट्रेंडिंग बातम्या-
चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात 832 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
आयसीसच्या संपर्कात असलेल्या तरुणीचं बारामती कनेक्शन; पुण्यातून अटक
महत्त्वाच्या बातम्या-
देशात कोरोनाबाधितांच्या संख्येने 9 लाखांचा टप्पा ओलांडला, गेल्या 24 तासांत तब्बल इतक्या जणांना लागण
बकरी ईदला कुर्बानीसाठी सूट द्या, नसीम खान यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे राष्ट्रीय कार्य पडद्यामागून पण…., सामनातून टीकेचे बाण
Comments are closed.