मनोरंजन

अंकिता लोखंडेचा सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी सर्वात मोठा खुलासा; रियाबाबत सुशांत म्हणाला होता की…

मुंबई | सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळणं लागलं आहे. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात पटणामध्ये गुन्हा दाखल केल्यानं बिहार पोलिसांची टीम आता तपासासाठी मुंबईत दाखल झाली आहे. या टीमने सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेची चौकशी केली. विशेष बाब म्हणजे या चौकशीत अंकितानंही याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

बिहार पोलिसांना चौकशी दरम्यान अंकिता म्हणाली की, सुशांत रिया चक्रवर्तीच्या नात्यात खूश नव्हता. सुशांतनंच स्वतः अंकिताला वाढदिवशी मॅसेज करत याची माहिती दिली होती. सुशांत सोबतच हे चॅटदेखील अंकितानं बिहार पोलिसांकडे सूपूर्त केलं आहे.

सुशांत ब्रेकअपनंतरही अंकिताशी बोलत असे मात्र रियाला ही गोष्ट आवडत नव्हती. मात्र सुशांतने त्याच्या ड्रिपेशनच्या त्रासाबद्धल कधीच अंकिताला काहीच सांगितलं नव्हतं. असा खुलासाही अंकितानं बिहार पोलिसांकडे केला.

तसेच सुशांतशी अंकिताचं शेवटचं बोलणं झालं तेव्हा सुशांतने बिहारमधील 100 मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची इच्छा व्यक्त केली होती, अशी माहिती देखील अंकितानं यावेळेस दिली आहे. जवळपास 50 मिनिटांची विचारपूस पार पडल्यावर बिहारची पोलिसांच्या टीमनं अंकिताचा निरोप घेतला.

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करावे , विधानसभा अध्यक्षांची सूचना

….नाहीतर शिक्षण मंत्रालयाचे अवजड उद्योग खाते होईल, शिवसेनेचा टोला

शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता कृषीमंत्र्यांची केंद्र सरकारकडे महाराष्ट्रासाठी विशेष मागणी

सीरम इन्स्टिट्यूटला मोठा धक्का! ऑक्सफोर्ड लसीच्या भारतातील ह्युमन ट्रायलची मागणी टाळली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या