मनोरंजन

सुशांत आत्महत्या करूच शकत नाही; अंकिता लोखंडेनं केले अनेक धक्कादायक खुलासे

मुंबई | सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास एका नव्या वळणावर जाऊन पोहचला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर अंकिता लोखंडे आता मैदानात उतरली असून सुशांतच्या आयुष्याबाबत तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

न्यूज 18 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली की, सुशांत काम भेटलं नाही म्हणून कधीच तणावात जाणार नाही. या काळातही भरपूर चित्रपटात कामाच्या संधी त्याला मिळतच होत्या. उलट सुशांत अनेक चित्रपट नाकारत असे. त्याला बौद्धिक कुवत चांगली असलेल्या लोकांशी बोलायला आवडत असे.

सुशांत सर्वांशी भरभरून बोलायचा. मग त्याला आता सगळेजण डिप्रेशनचा आजार म्हणत आहेत. मात्र मला माहितेय की सुशांत कधीच डिप्रेस होऊ शकत नाही. त्याला फक्त वाईट वाटू शकतं. पण आत्महत्येसारखा विचार त्याच्या मनातही येणार नाही,असा दावा अंकितानं केला आहे.

याउलट सुशांत म्हणायचा की माझ्याकडून सगळ घेऊन जावा. त्याला पैशांची कधीच पडलेली नसायची. त्याला चित्रपटात कामाची संधी मिळाली नसती तर शाॅर्ट फिल्म मध्ये काम केलं असतं. तो कधीच खचला नसता. अगदीच शेती करूनही आनंदी राहीला असता. मला सुशांत म्हणायचा की मला शेती करूनही आनंदच मिळेल, असं मतही अंकितानं मुलाखती दरम्यान व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

काळजी घ्या! शरीराच्या ‘या’ अवयवातही लपून बसू शकतो कोरोना व्हायरस

कोरोना साखळी तोडण्यासाठी…., गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे निर्देश

‘त्याग, समर्पणाच्या शिकवणीचा वसा घेऊ या’, मुख्यमंत्र्यांकडून बकरी ईदच्या शुभेच्छा

‘या’ दोन शहरांत 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या