मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिनं त्यासाठी आणखी एक पोस्ट शेअर करत तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. जिथं आहेस तिथं आनंदी राहा, असं तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
14 जुलै रोजी अंकितानं एक पोस्ट शेअर केली होती. देवघराच्या पुढं तिनं दिवा लावला होता. या फोटोला कॅप्शन देनाता अंकिताना फक्त ‘देवाचं मुल’ एवढंच लिहिलं. अंकिताच्या या पोस्टवर अनेकांनी तिला खंबीर होण्याचा सल्ला दिला. अंकिता सोशल मीडियावर महिन्याभरापर्यंत सक्रिय होती. सुशांतच्या जाण्यानंतर तिने एकही पोस्ट शेअर केली नाही.
अंकिताने शेवटची पोस्ट सुशांतच्या जाण्याच्या एक दिवसआधी 13 जूनला केली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी अंकिता त्याच्या वांद्रे येथील घरी कुटुंबाला भेटायला गेली होती.
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांत आणि अंकिता एकत्र काम करत होते. त्यानंतर सुशांतनं मालिका सोडली आणि तो बॉलिवूडमध्ये गेला. तिथं स्थिरावण्यासाठी त्यानं जोरदार प्रयत्न सुरू केले. या दरम्यानच दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती.
महत्वाच्या बातम्या-
आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी तज्ज्ञांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागितली मदत
महाविकास आघाडीमध्ये पुन्हा नाराजीनाट्य; काँग्रेसच्या ‘या’ निर्णयामुळे शिवसेना-राष्ट्रवादी नाराज!
आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…
रिक्षात बसलेला तरुण पोलिसांना वाटला संशयास्पद; झडती घेतल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार!
भारतीय क्रिकेट संघाला 2 आठवडे ऑस्ट्रेलियामध्ये ठेवणार विलगीकरणात
Comments are closed.