मुंबई | जी व्यक्ती हा दावा करत असेल की, ती एखाद्यावर खूप प्रेम करते. अशात ती व्यक्ती प्रिय व्यक्तीची मेंटल हेल्थ माहीत असूनही त्याला ड्रग्स कसं देणार? तुम्ही असं करणार का? मला नाही वाटत की असं कुणी करेल, असं सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने म्हटलंय.
अंकिता लोखंडेने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये अंकिताने रियावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
मला पुन्हा पुन्हा मीडिया विचारतं की, काय वाटतं हा मर्डर आहे की सुसाइड? त्यामुळे मी हे स्पष्ट करण्यासाठी सांगते की, मी कधीच म्हणाले नाही की, हा मर्डर आहे किंवा यासाठी एखादी विशेष व्यक्ती जबाबदार आहे. मी नेहमीच माझा दिवंगत मित्र सुशांत सिंह राजपूतच्या न्यायाची मागणी केली आहे. मी त्याच्या परिवारासोबत उभी आहे. आणि तपास यंत्रणेसमोर सत्य आलं पाहिजे, असं अंकिताने म्हटलंय.
दरम्यान, रियाने सुशांतच्या फॅमिलीला ट्रीटमेंटबाबत सांगितलं होतं. पण सुशांत ड्रग्स घेत होता याबाबत सांगितलं होतं का? माझा विश्वास आहे की, असं काही झालं नसेल. कारण कदाचित तिच हे एन्जॉय करत होती आणि त्यामुळे मला वाटतं की, हे कर्म आहे, असं अंकिता म्हणालीये.
महत्वाच्या बातम्या-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबतचा विकल्प अर्ज उपलब्ध
‘जलयुक्तचा उंच फुगवलेला फुगा फुटला कसा?, नाव मोठं लक्षण खोटं”
“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ आली आहे, तुम्ही सहमत आहात का?”
येतो ट्रेलर है भाई पिक्चर अभी बाकी है! सरावादरम्यान हिट मॅनने चेंडू लावला मैदानाबाहेर; पाहा व्हिडीओ
“महाराजांनी महिलांचं रक्षण करायला शिकवलं मात्र ‘हे’ लांडग्यासारखं कंगणाच्या मागे लागलेत”
Comments are closed.