बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मणिकर्णिका चित्रपटातील झलकारी बाईचा फर्स्ट लूक

मुंबई | ‘मणिकर्णिका ‘ चित्रपटातील अंकिता लोखंडेचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. हिरव्या आणि लाल रंगाच्या साडीत अंकिता लोखंडे अतिशय सुंदर दिसत आहे.

कंगना राणावतच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यात ती  झलकारी बाईच्या भूमिकेत दिसणार आहे. झलकारी बाई या राणा लक्ष्मीबाईच्या विश्वासू सैनिक होत्या.

हा चित्रपट झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. क्रिश जगरलामुडी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून कमल हसन या चित्रपटाची  निर्मिती करणार आहेत. येत्या 3 ऑगस्ट 2018 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More