इंदापूर | हर्षवर्धन पाटील संधीसाधू असल्याची टीका युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
सत्यजीत तांबेंची कुवत सगळ्या राज्याला माहिती आहे. लहान तोंडी मोठा घास त्यांनी घेऊ नये. ज्येष्ठ नेत्याबद्दल बोलताना मान ठेवायला हवा. तसंच दिशाभूल करणारी वक्तव्यं त्यांनी टाळावीत, अशा शब्दात अंकिता पाटील यांनी तांबेंना प्रत्युत्तर दिलं.
राज्यातील ज्येष्ठ नेत्यावर बोलताना काही सुसंस्कृतपणाचे संकेत असतात ते त्यांनी पाळायला हवे होते. परंतु त्यांनी तसं काही केलं नाही. शेवटी मोठ्या नेत्यावर बोललं म्हणजे आपण मोठे होत नसतो तर त्यासाठी काम करावं लागतं, असा टोला अंकिता यांनी लगावला.
युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी तांबेंची निवड करण्यात हर्षवर्धन पाटील यांचा मोठा वाटा आहे. तांबेंचं वय हे भाऊंच्या राजकीय कारकीर्दीएवढंही नाही. तेव्हा टिकाटिप्पणी करण्यापूर्वी सत्यजीत तांबेंनी वयाची जाणीव तरी ठेवायला हवी होती, असं अंकिता पाटील म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
हरियाणातील भाजप सरकारला मोठा धक्का!
कामाला लागा, पोलिसांना घरे बांधून द्या- उद्धव ठाकरे
महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना; पेणमध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या
सावधान! कोरोना लसीकरणाच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते
कोरोनाला रोखण्यासाठी ‘सामना’तून शिवसेनेनं केंद्र सरकारला दिला महत्वाचा सल्ला!
Comments are closed.