बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांतच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंकिताने शेअर केला आठवणीतील ‘हा’ भावनिक व्हिडीओ

मुंबई | गेल्या वर्षी 14 जूनला प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर या आत्महत्येने वेगळंच वळण घेतलं आणि हत्येचा विषय समोर आला. तसेच आज सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्त अनेक लोक त्याचं स्मरण करत आहेत. यामध्ये सुशांतची एक्स गर्लफ्रेंण्ड अभिनेत्री अंकिता लोखंडे हीने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.

काही दिवसांपुर्वी अंकिताने इन्स्टाग्रामवरुन ब्रेक घेतला असल्याचं समोर आलं होतं. यानंतर तिने एक फोटो देखील शेअर केला होता. अशातच आज अंकिताने सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्ताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. या व्हिडीओमध्ये अंकिता आणि सुशांतचे आजपर्यंतचे सर्व फोटो आहेत.

या व्हिडीओला अंकिताने अतिशय भावनिक असं कॅप्शनही दिलं आहे. यामध्ये तिने 14 जून, हा होता आमचा प्रवास, फिर मिलेंगे चलते-चलते, असं कॅप्शन दिलं आहे. अंकिताने फक्त हाच व्हिडीओ नाही तर सुशांतसोबतचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. अंकिताने शेअर केलेला फोटोंचा व्हिडीओ तिच्या आणि सुशांतच्या चाहत्यांना देखील फार आवडला असून या व्हिडीओवर अर्थातच त्यांच्या जोडीवर भरभरुन प्रेम दाखवण्यात आलं आहे.

दरम्यान, अंकिताने सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त तिच्या घरी यज्ञ-हवन ठेवलं होतं. अंकिता आणि सुशांतने अनेक वर्षांपुर्वी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमध्ये एकत्र काम केलं होतं. यादरम्यानच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांचं हे नातं जास्त काळ टिकलं नाही. तसेच अंकितानंतर सुशांत बाॅलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत प्रेमसंबंधात होता. त्याच्या आत्महत्येनंतर रियानेच त्याची हत्या केल्याचा आरोप अनेकांनी केला होता. मात्र, हे रहस्य अद्याप उलगडलेलं नाही.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

थोडक्यात बातम्या-

नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…

तलावात 500च्या नोटा तरंगताना दिसल्या, नंतर झालं असं काही की…

फेसबुक लाईव्ह करत रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर शेतकऱ्याचा गंभीर आरोप, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! उदयनराजे आणि संभाजीराजेंची होणार पुण्यात भेट ‘या’ विषयावर होणार चर्चा

“कोल्हापूरकरांनो, निर्बंध लादण्याची आम्हाला हौस नाही, थोडं सोसा”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More