बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अवघ्या 23 वर्षांची अंकिता झाली ‘या’ गावची सरपंच; गावाबद्दल असलेलं स्वप्न ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क

अमरावती | अमरावती जिल्ह्यात 537 ग्रामपंचायतीसाठीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. आता सरपंच पदासाठी निवडणूक सुरु झाली. त्यामुळे गावागावात राजकारण सुरु आहे. त्यासाठी गावातल्या नेत्यांनी राजकीय खेळी खेळायला सुरवात केली आहे. आपल्या गटाचा सरपंच कसा होईल, ग्रामपंचायतवर आपला झेंडा कसा रोवता येईल, यासाठी गावपुढाऱ्यांची चढाओढ सुरू आहे. मात्र, यातच शिराळा गावातील अवघ्या 23 वर्षाच्या अंकिता मिलिंद तायडे या तरुणीची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.

गावागावात सरपंच निवडणुकीला सुरुवात झाली आहे. गावचा सरपंच हा चांगला अनुभवी व्यक्ती, राजकारणात मुरलेला असावा. त्याचं वय त्याची प्रतिष्ठा हे सगळं बघितल्या जातं. तरी अमरावती जिल्ह्यातील शिराळा या 18 हजार लोकसंख्येच्या गावाचा कारभार 23 वर्षाची उच्चशिक्षित असलेली अंकिता मिलींद तायडे ही तरुणी पाहणार आहे.

अंकिता तायडेचं शिक्षण एमएससी झालं आहे. ‘माझं शिक्षण माझ्या गावाच्या विकासासाठी नक्कीच कामी येईल. माझं शिक्षण पाहून गावातील लोकांनी मला निवडून दिलं आहे. माझ्याकडून त्यांना खूप अपेक्षा आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करुन माझं शिराळा गाव कसं आदर्श होईल, महाराष्ट्रात माझ्या गावाला एक वेगळी ओळख कशी मिळेल, यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे’, असं नवनिर्वाचित सरपंच अंकिता तायडे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, यावर्षी या ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदाचं आरक्षण हे अनुसूचित जाती-जमातीसाठी निघालं होतं. त्यामुळे अंकिता तायडेची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ‘अवघ्या 23 वर्षांची आमच्या गावची अंकिता ही आमच्या गावाचे नेतृत्व करीत आहे. एक महिला ते ही कमी वयात सरपंचपदी नियुक्त झाल्यामुळे आम्हाला तिचा अभिमान आहे. अंकिताने आता गावातील महिलांसाठी विविध योजना राबवाव्यात’, असं मत गावातील महिलांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या

मोठी बातमी : 100 कोटी प्रकरणात आता ‘ईडी’ची एन्ट्री?

…म्हणून या जोडप्यानं नव्या शेजाऱ्यांना वाटली चक्क मोफत बीअर!

“कारवाई न करण्यासाठी 50 लाख तर नोकरीत परत घेण्यासाठी 2 कोटी”; परमबीर सिंग अडचणीत

शरद पवारांनी नाव घेतलेले ज्युलिओ रिबेरो म्हणतात, “हे काम मी करणार नाही!”

“जो न्याय शिवसेनेच्या मंत्र्याला लावला तो न्याय राष्ट्रवादीच्या मंत्र्याला लावणार का?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More