Top News देश

अंकिताने बिकीनीमध्ये टाकला फोटो, सुशांतचे फॅन चांगलेच भडकले, म्हणाले…

Photo Courtesy: Instagram/ Ankita Lokhande

मुंबई | अभिनेत्री अंकिता लोखंडे ही 2009 मध्ये पवित्र रिश्ता या मालिकेतून लोकांच्या पसंतीला येऊन प्रसिद्ध झाली. या मालिकेदरम्यान पवित्र रिश्ता मालिकेचा लिड हिरो सुशांत सिंग राजपूत सोबत अंकिताचे 6 वर्ष संबंध होते. मात्र लाॅकडाऊनच्या दरम्यान सुशांतचे निधन झाले.

सुशांतच्या निधनानंतर अंकिता त्याच्या घरी सुद्धा गेली होती. एवढंच नव्हे तर त्याच्या आत्महत्येप्रकरणी त्याला न्याय मिळवून देण्यासाठी अंकिता झटत होती. आपल्या सोशल मीडियावरुन अंकिता सतत सुशांतची बाजू मांडत होती. त्यामुळे अंकिताला सुशांतविषयी किती प्रेम वाटत होतं, हे लोकांच्या लक्षात आलं होतं.

अंकिताच्या लेटेस्ट पोस्टमध्ये तिने काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये काढलेले फोटोज अपलोड केले आहेत. इतके सोपे होऊ देऊ नका, की कोणीही येईल आणि तुमचा शोध घेईल असा संदेश तिने या फोटो मधून दिला आहे. मात्र या फोटोज वरुन सुशांतच्या फोलवर्सनी जोरदार टीका केली आहे. सुशांतच्या नावावर खूप प्रसिद्धी मिळवत आहेस अशी एकाने कमेंट केली असून इंस्टा पोस्ट शिवाय कोणताच प्रोजेक्ट उरला नाही, असं सुद्धा एकाने लिहिलं आहे.

दरम्यान, अंकिताने मणिकर्कर्णिका या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये एंट्री केली आहे तसेच अंकिता लोखंडे सध्या विकी जैन सोबत रिलेशनशिपमध्ये असून दोघेही लवकरच लग्नाची गाठ बांधणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

“भूखंड घोटाळ्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांचीही चौकशी करा”

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ व्यक्तीला घेतलं ताब्यात

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

‘मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आणखी किती वर्षे टोल वसुली करणार?’; उच्च न्यायालयाने सरकारला सुनावलं

राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता; पाहा काय आहे प्रकरण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या