Top News धुळे महाराष्ट्र

“शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटीव्ह राहतील पण आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह”

धुळे | राष्ट्रवादी काँग्रसे पार्टीचे अध्यक्ष शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटीव्ह राहतील पण धनगर आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह असल्याचं धनगर समाज महासभेचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकार धनगर समाजाला न्याय देईल, असंही अण्णा डांगे यांनी म्हटलं आहे. धुळ्यात सुरू असलेल्या दोव दिवसीय धनगर समाज महासभेच्या अधिवेशनात ते बोलत होते.

धनगर आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केल्याचा आरोपही अण्णा डांगे यांनी केला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत पुढील दिशा 3 डिसेंबरला ठरणार आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतही मराठा समाज पेटला आहे. यासंदर्भात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. अन्य समाजाचं आरक्षण, अधिकार अबाधित ठेवा. पण मराठा समाजावर अन्याय का? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“भाजपच्या नटीने मुंबईला ‘पीओके’ म्हटले त्याच भाजपच्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या विकासासाठी मुंबईत यावं लागलं”

सुपर न्यूमररी पद्धतीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक- खासदार संभाजीराजे

“शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येणार नाही, पवार इज पॉवर”

डाॅ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार!

“महाविकास आघाडीचं सरकार तीन पक्षांची रिक्षा म्हणता, वाजपेंयींनी तर एनडीएचा महाट्रक चालवलेला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या