बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हक्काने मला आदेश देत जा”

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केले आणि भाजपसोबत युती करत सरकार स्थापन करुन मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. शिंदे यांनी अण्णा तुमचे आशिर्वाद असु द्या, अशी हात जोडून विनंती केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपले दोनही हात जोडून नमस्कार केला. तसेच मी एकनाथ शिंदे बोलत असल्याचं सांगितलं. यावेळी शिंदेंनी अण्णांना तुमचे आशिर्वाद असुद्या, तुमचे मार्गदर्शन असुद्या अशी मागणी केली. यावर अण्णा हजारे यांनी ईश्वराचे आशिर्वाद तुमच्यासोबत आहेत असं म्हंटलं. तसेच एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत जे काम केलं त्याचीच ही पावती असल्याची अण्णा हजारेंनी म्हटलं.

एकनाथ शिंदेंनी अण्णा हजारेंना तुमचे मार्गदर्शन असुद्या आणि जेव्हा तुम्हाला काही वाटेल तेव्हा आदेश करत जा, सुचना करत जा, मार्गदर्शन करत जा. अशी विनंती केली. आम्ही राज्याच्य़ा विकासाचे काम करु. माझे सहकारी देवेंद्र फडणवीस आणि आमदार जनतेला अपेक्षीत असलेले काम करु. तुम्हाला वाटेल तेव्हा हक्काने मला आदेश देत चला, असं एकनाथ शिंदे यांनी अण्णा हजारेंना म्हटलं.

अण्णा हजारे यांनी एकनाथ शिंदे यांना आशिर्वाद दिले, अभिनंदन केले आणि आभार देखील मानले. विशेष म्हणजे या संभाषणात शेवटी हजारे यांनी माझी एकच विनंती आहे असे म्हणत आपली एक अपेक्षा व्यक्त केली आणि फोन कट झाला. त्यामुळे अण्णांची ती एक विनंती काय आहे हे कळू शकले नाही.

थोडक्यात बातम्या –

मोठी बातमी! शिवसेनेतून आणखी एका बड्या नेत्याची हकालपट्टी

राज्यातील नवीन सरकारबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले….

“तीन दशकातील मराठी रंगभूमीला व्यामीश्र संघर्षाची पार्श्वभूमी”

“शिवसेनेची एकनाथ शिंदेंवरील कारवाई बेकायदेशीर, त्याला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ”

शिवसेनेने जारी केलेल्या व्हिपबद्दल एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले, म्हणाले…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More