महाराष्ट्र मुंबई

‘सरपंच पदाचा लिलाव म्हणजे…’; अण्णा हजारेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | काही ग्रामपंचायतींनी सरपंचाच्या पदाचा लिलाव करून बोली लावल्याची बातमी वाचली. वास्तविक पाहता हा सरपंच पदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव केला आहे, अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी याला विरोध केला आहे. अण्णा हजारे यांनी यासंदर्भात एक पत्रक काढलं आहे.

ज्या लोकशाहीसाठी 1857 ते 1947 या नव्वद वर्षात लाखो लोकांनी जेलमध्ये जाऊन, भूमिगत राहून इंग्रजांच्या गोळ्या, लाठ्या-काठ्या खाऊन अनंत हाल अपेष्टा सहन केल्या. जुलमी, अन्यायी इंग्रजांना देशातून घालवायचे आणि आमच्या देशात लोकांची, लोकांनी, लोक सहभागातून चालविलेली लोकशाही आणायची असं त्यांचं स्वप्न होतं. पण सरपंच पदाचा लिलाव म्हणजे त्या लोकशाहीचाच लिलाव आहे असं आमचं मत आहे, असं अण्णा हजारे म्हणाले.

ज्यांनी देशात लोकशाही यावी यासाठी काही लोकांनी प्राणांचे बलिदान केले त्यांचे बलिदान व्यर्थ झाले आहे काय? किंवा 70 वर्षात काही लोकांना लोकशाहीचा अर्थ समजला नाही की काय?, असा सवाल अण्णा हजारे यांनी केला आहे.

ग्रामपंचायत सरपंच पदाचा लिलाव झाला तर लोकसभा आणि विधानसभा कमजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्या आमदार आणि खासदार यांना ग्रामसभेने निवडून पाठवलं असल्याने आणि लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचारी, व्यभिचारी लोक त्या पवित्र मंदीरामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

थो़डक्यात बातम्या-

आयटीआयची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू!

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आरोग्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचन

कोरोना रुग्णांना वाचवण्यात भारत इतर देशांपेक्षा कितीतरी पटीने आघाडीवर- नरेंद्र मोदी

कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही- अजित पवार

“निवडणूक जवळ आल्यावरच शिवसेनेला औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आठवतो”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या