Top News

पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रियेत सुधारणा करा; अण्णा हजारे यांचं नरेंद्र मोदींना पत्र

अहमदनगर | आपली पोलीस यंत्रणा आणि न्यायालये महिलांना न्याय देण्यास विलंब लावत आहेत. त्यामुळे संसदेने कडक कायदे करायला हवेत, असंं पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे.

निर्भयाला न्याय मिळावा म्हणून 20 डिसेंबरपासून मौन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. अण्णांनी या पत्रात आपला संताप व्यक्त केला आहे. अत्याचाराच्या प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रियेत जो विलंब होत आहे त्यामुळे देशातील जनतेत असंतोष आहे. या उद्विग्नतेतूनच लोकांनी हैद्राबादमध्ये झालेल्या एन्काऊंटरचं स्वागत केलं, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

महिलेवरील अत्याचार आणि हत्या या प्रकरणात पश्चिम बंगालमध्ये 14 ऑगस्ट 2005 ला एकाला रोजी फाशी दिली गेली. त्यानंतर एकाही घटनेत अद्याप फाशी झाली नाही, असंही अण्णा हजारे यांनी सांगितलं.

दरम्यान, अत्याचाराची केस दाखल करण्यापासूनच पोलिसांचा विलंब सुरु होतो. ‘पोलीस रिफॉर्म’चा मुद्दा जसा प्रलंबित आहे. तसेच न्यायिक उत्तरदायित्व विधेयकही प्रलंबित आहे. हे विधेयक आलं असतं तर न्यायालयीन प्रक्रियेत सुधारणा झाली असती, असंही अण्णांनी म्हटलं आहे.

 महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या