पुणे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अण्णा हजारे म्हणतात…

अहमदनगर | अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदूंची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. या पार्श्वभुमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अयोध्याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निकालाचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे, असं अण्णा हजारे यानी म्हटलं आहे.

अनेक वर्षांपासून या प्रश्नी वाद-विवाद होते. मंदिर-मशिदीच्या वादाचे अनेकांनी राजकारण केलं. परंतु सर्वोच्च न्यायालय नेहमी आपला देश एकसंध ठेवत आले आहे. न्यायालयाने निकाल देताना मंदिर आणि मशिद या दोघांचेही निर्माण करण्यास सांगितलं आहे, असं अण्णा हजारे यांनी म्हटलंय.

वाद-विवाद संपून गुण्या-गोविंदाने नांदण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आपला देश विविध जाती-धर्मांनी नटलेला आहे. तरी देखील आपण सगळे एक आहोत, हा एक मोठा संदेश या निकालातून घ्यायला हवा, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या