अहमदनगर | आपलं कोणी काही करू शकत नाही, अशा भ्रमात सध्याच्या सरकारनंही राहू नये, असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी आपल्या मोदी सरकारला इशारा दिला आहे.
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ दिल्लीत जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात उपोषणाला बसणार असल्याचं अण्णांनी सांगितलं आहे. मात्र सरकारविरोधात उपोषण करतो म्हणून केंद्र सरकार आपल्याशी सूडबुद्धीनं वागते की काय, असा संशय निर्माण होत आहे, असं अण्णा यांनी म्हटलं आहे.
तत्कालीन काँग्रेस सरकार अशाच सुडाच्या भावनेनं उपोषण करून नये म्हणून आपल्याला तुरुंगात टाकलं होतं. मात्र हे त्यांना चांगलंच महागात पडलं. जनतेनंच त्या सरकारला धडा शिकविला होता त्यामुळे कोणीही भ्रमात राहू नये, असं म्हणत अण्णांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे.
मतदार हा राजा आहे. त्यांनी मनात आणलं तर काहीही होऊ शकतं. शांतता आणि असंहिसेच्या मार्गानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळं काहीही झालं तरी या महिन्याच्या अखेरीस आपण आंदोलन करणार असल्याचं अण्णा म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“मुंबई-महाराष्ट्रातील देशी औवेसी कोण? ते लवकरच कळेल”
…यांच्या भजनांसमोर लता मंगेशकरांंचं गाणं फिकं पडतं- भगतसिंह कोश्यारी
सेना-भाजपमध्ये बॅनरवॉर, सुपर संभाजीनगर बोर्डासमोर भाजपचा ‘नमस्ते संभाजीनगर’
राज्यात पहिल्या दिवशी ‘इतक्या’ कोरोना योद्ध्यांना मिळणार लस!
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार राज्यव्यापी कोरोना लसीकरणाचा लसीचा शुभारंभ
Comments are closed.