बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तहसीलदार मॅडम ‘तो’ विचार डोक्यातून काढून टाका’; अण्णा हजारेंचा तहसीलदारांना मोलाचा सल्ला

अहमदनगर | पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली होती. या क्लिपमधून पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर त्यांचा रोष असल्याचं दिसून आलं. क्लिपमध्ये त्यांनी आपण आपलं जीवन संपवणार असल्याचं म्हटलं होतं. अशातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी तहसीलदार ज्योती देवरे यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

मला तुमच्यातल्या भांडणात पडायाचं नाही, कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. याबाबत मी काही बोलणार नाही. पण तहसीलदार मॅडम मी तुम्हाला काय करायचं ते करा फक्त जीवन संपण्याचा विचार डोक्यातून काढून टाका, असा सल्ला अण्णा हजारे यांनी ज्योती देवरे यांना दिला आहे.

जेव्हा ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती त्यावेळी निलेश लंके यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर पारनेरची बदमानी करण्याचं थांबवा, गरज पडली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेईल, असं अण्णा हजारे यांनी म्हणाले होते. यावर बोलताना निलेश लंके यांनी, ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. तसा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांनी पाठवला असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, निलेश लंके यांना प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनीही पाठिंबा दर्शवला होता. कुत्री कितीही भुंकली तरी हत्ती थाटात चालतो, लंके तुम्ही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करा, असं इंदोरीकर महाराज यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

महेश मांजरेकर कॅन्सरग्रस्त! प्रकृतीबाबत आली ‘ही’ मोठी माहिती समोर

तुमच्याजवळ फाटलेल्या नोटा आहेत?, वाचा कशा बदलाल या फाटलेल्या नोटा?

भाजप मंत्र्याचा कारनामा; जिवंत सैनिकाला वाहिली श्रद्धांजली

महाविकास आघाडी म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे- देवेंद्र फडणवीस

“14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More