अहमदनगर | सरकारनं दिलेलं आश्वासन मुदतीत पाळलं नाही तर देशभर फिरुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
सरकारनं मागून घेतलेल्या मुदतीत आश्वासनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केलं नाही तर सरकार किती खोटारडं आहे हे देशभर फिरून सांगेन, असं अण्णा हजारे म्हणाले आहेत.
उपोषण मागं घेतलं म्हणजे आंदोलन संपलं असा समज करुन घेऊ नका, असं देखील अण्णा हजारे म्हणाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकपाल आणि लोकायुक्ताच्या मुद्द्यावर सुरु केलेलं अण्णा हजारेंनी सातव्या दिवशी उपोषण सोडलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
–मुंडे साहेबांचा अपघात झाला की घात? हा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना पडलेला प्रश्न- धनंजय मुंडे
–“…तर त्यांना बाटलीत बंद करुन अरबी समुद्रात टाकू”
–“डोनाल्ड ट्रंम्प यांनीही केली नरेंद्र मोदींच्या राज्यकारभाराची प्रशंसा”
–…यांना विकास नको फक्त सत्ता पाहिजे- देवेंद्र फडणवीस
–भाजप शिवसेनेच्या युतीचा निर्णय ‘या’ तीन जागांमुळं अडला?