पुणे महाराष्ट्र

अखेर सात दिवसांनी अण्णांनी उपोषण मागं घेतलं

अहमदनगर | जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी अखेर सातव्या दिवशी उपोषण मागं घेतलं आहे. आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे उपोषण मागे घेत असल्याची घोषणा अण्णांनी केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. लोकपाल नियुक्तीसाठी उपोषणाला बसलेल्या अण्णांची मनधरणी करण्यात सरकारला यश मिळालं आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची बंद दाराआड चर्चा झाली आहे. त्यानंतर अण्णांनी उपोषण मागे घेतलं. 

अण्णांच्या सगळ्या मागण्या मान्य आहेत. यावर तोडगा काढण्यात येईल. त्यासाठी एक समिती असेल त्या समितीमध्ये अण्णा असतील आणि पुढील अधिवेशनात अण्णांच्या मागण्यांचा विचार करुन त्यांना मंजुरी दिली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

नांदेडची स्वराली जाधव ठरली ‘सूर नवा-ध्यास नवा’ची महाविजेती

अखेर तीन दिवसांनंतर ममता बॅनर्जींचं धरणं आंदोलन मागे

काँग्रेस मुख्यालयात लागली ‘प्रियांका गांधी-वाड्रा’ नावाची पाटी, भावा शेजारी बहिणीची केबीन!

चालू सामन्यात मैदानावरच क्रिकेटपटूने घेतला अखेरचा श्वास

काँग्रेसला मोठा धक्का, कदाचित ‘हा’ नेता लोकसभा निवडणुक लढणार नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या