अहमदनगर महाराष्ट्र

‘मी माझ्या आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही, त्यामुळे…’; अण्णा हजारेंचं मोदींना पत्र

अहमदनगर | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात अण्णा हजारे यांनी सरकारला स्वामिनाथन आयोगाची आठवण करून दिली आहे.

देशातील सरकारने सत्तेसाठी सत्य त्यागने बरे नाही. त्यामुळे देशातील जनतेपर्यंत चुकीचा संदेश जातो. जी गोष्ट करता येत नाही, ती करता येत नसल्याचं सरकारने स्पष्ट सांगायला हवं, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

जेव्हा सरकार अडचणीत येतं तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना खोटी आश्वासने द्यावी लागतात, पण मी माझ्या आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही. त्यामुळेच सरकारचं हे वेळकाढू धोरण मला त्रासदायक वाटतं, असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे.

सरकार शेतकऱ्यांबद्दल संवेदनशील आहेत तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत?, असा सवाल  अण्णा हजारे यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या-

“राज्यात महाविकासआघाडीच्या तुलनेत भाजप 20 टक्के देखील नाही”

भाजप आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात!

“पाटील हा श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा, पण धनंजय मुंडेंसारखा नसावा”

“ये नया भारत है…घर में घुसकर मारता है”

BCCI ने पेटारा उघडला, भारतीय संघाला ‘इतक्या’ कोटींचा बोनस जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या