बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावर अण्णा हजारे नाराज, म्हणाले…

अहमदनगर | राज्य सरकारनं नुकताच किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर अनेकांचा विरोध असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रातील जनतेसाठी हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे. राज्य सरकार असे निर्णय घेऊन सरकारला कुठे घेऊन जाणार आहे, असा प्रश्नही अण्णा हजारे यांनी उपस्थित केला. केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचं पाहून दुःख होत आहे, असंही अण्णा हजारे यांनी म्हटलं.

पुढे अण्णा हजारे म्हणाले, उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करून हे मद्य स्वस्त करण्यात आलं. यातून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल आणि सरकारला मिळणारा महसूल 100 कोटींवरून 250 कोटींवर जाईल, असा विचार सरकारनं केला असल्याचं समजतय. याचाच अर्थ लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे असा अट्टाहास दिसून येतो.

दरम्यान, सरकारनं घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा राज्यातील जनता निषेध करीत आहे तर सरकारमधील लोक मात्र या निर्णयाचे समर्थन करीत आहेत. वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

थो़डक्यात बातम्या – 

“पैसे कमविण्याच्या नादात दर्जाहिन मालिका प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात आहेत”

“महाराष्ट्रात पुढचे 25-30 वर्षे भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही”

हाॅटेलच्या टेरेसवरुन उडी मारत फॅशन माॅडेलचा आत्महत्येचा प्रयत्न, वडिलांना व्हिडीओ काॅल करत म्हणाली….

IPL 2022: ‘या’ स्टेडिअमवर रंगणार यंदाचे Playoff चे सामने?

Budget 2022: सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या देशांमध्ये भारत आघाडीवर – रामनाथ कोविंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More