‘भारत स्वतःहून कोणाची छेड काढत नाही, पण…’; ‘ऑपरेशन सिंदूर’वर अण्णा हजारेंचं मोठं वक्तव्य

Anna Hazare

Operation Sindoor | पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने (India) केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी कौतुक केले आहे. भारत स्वतःहून कोणाची छेड काढत नाही, पण डिवचल्यास सोडत नाही, असे ते म्हणाले. या कारवाईनंतर खबरदारीचा उपाय म्हणून १० मे पर्यंत ९ विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

अण्णा हजारेंकडून लष्कराचे अभिनंदन

भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईनंतर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनीही या कारवाईचे समर्थन करत भारतीय लष्कराचे अभिनंदन केले. “लष्कराने केलेल्या कामाचे शब्दांत कौतुक करता येणार नाही, इतके सुंदर काम त्यांनी केले आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अण्णा (Anna Hazare) म्हणाले की, “भारत (India) स्वतःहून कोणाची छेडखानी करत नाही. मात्र, जर कोणी डिवचले तर त्याला सोडायचे नाही, ही कारवाई योग्यच आहे. काहीही कारण नसताना आमचे २६ लोक मारले गेले, त्याचा बदला भारताने घेतला आहे, त्यामुळे आता कोणी काही बोलू शकत नाही. अशा प्रकारे कारवाई केल्याने आता कोणाची हिंमत होणार नाही.”

सुरक्षेसाठी ९ विमानतळ १० मे पर्यंत बंद

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर आणि सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने (Central Government) खबरदारीचा उपाय म्हणून १० मे पर्यंत देशातील नऊ महत्त्वपूर्ण विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir), जोधपूर (Jodhpur), अमृतसर (Amritsar), चंदीगड (Chandigarh), राजकोट (Rajkot), भुज (Bhuj), श्रीनगर (Srinagar), लेह (Leh) आणि जामनगर (Jamnagar) या विमानतळांचा समावेश आहे.

एअर इंडियाने (Air India) १० मे रोजी सकाळी ५:२९ पर्यंत या नऊ शहरांमधील आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. देशातील इतर विमानतळांचे कामकाज सुरू राहणार असले तरी, तेथे सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. विमानतळांवर एरवीही कडक सुरक्षा असते, पण सध्या ती अधिक चोख ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra) आज (७ मे) मॉकड्रील (Mockdrill) आणि सायरन (Siren) वाजवून आपत्कालीन सज्जतेचा आढावा घेतला जाणार आहे.

Title : Anna Hazare Backs Operation Sindoor; Airports Shut

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .