अहमदनगर | मुख्यमंत्री नव्हे तर माजी मुख्यमंत्री लोकायुक्ताच्या कक्षेत येणार असल्याच्या शासनाच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
माजी मुख्यमंत्री लोकायुक्ताच्या कक्षेत येणार असतील तर मग मुख्यमंत्री असेपर्यंत भ्रष्टाचार करत राहायचा का?, असा सवाल त्यांनी केला आहे.
माझ्या 90 टक्के मागण्या पूर्ण केल्या आहेत, असं मुख्यमंत्री म्हणतात, पण तसं असतं तर मला उपोषणाला बसण्याची वेळच आली नसती, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अण्णा हजारे लोकायुक्तासह अन्य मागण्यांसाठी 30 जानेवारीपासून राळेगण सिद्धी येथे उपोषणाला बसले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-रोहित शेट्टीचा दिलदारपणा, ‘सिम्बा’च्या कमाईतील मोठा वाटा मुंबई पोलिसांना
-“राहुलजी, आजाराशी संघर्ष करणाऱ्याविषयी खोटं बोलण्याइतके तुम्ही असंवेदनशील”
-भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन
-धक्कादायक! जिल्हा परिषद शाळेतील खिचडीत निघाला साप
-महाआघाडीकडून मनसेचे महेश मांजरेकर विरुद्ध किरीट सोमय्यांची लढत?, हालचालींना वेग