बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिला तहसीलदार ऑडिओ क्लिप प्रकरणात अण्णा हजारेंची उडी, म्हणाले…

अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाची एक ऑडियो क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओमध्ये महिला तहसीलदार यांनी आपलं जीवन संपवणार असल्याचं म्हटल्यानं एकच खळबळ उडाली होती. त्यातच आता या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोठं भाष्य केलं आहे.

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना ऑडिओ क्लिप प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर अण्णा हजारे यांनी पारनेरची बदनामी करण्याचं थांबवा, असं आवाहन केलं आहे. तर या प्रकरणात अण्णा स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याची माहिती निलेश लंके यांनी दिली आहे.

ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. तसा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांनी पाठवला असल्याचं निलेश लंके यांनी सांगितलं होतं. त्यावेळी तहसीलदारांना सूचना केल्या होत्या तेव्हा त्यांनी मला अपरात्री आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठवला, असा दावा निलेश लंके यांनी केला होता. त्यानंतर निलेश लंके यांच्यावर भाजपने आक्रमक टीका केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. देव माणूस म्हणून वावरणाऱ्या पारनेच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणारे कशी वेसण घालतात?, तेच आता बघायचं आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“आपणच नियम करायचे आणि आपणच मोडायचे हे आमच्या रक्तात नाही”

राष्ट्रवादीचं महागाई विरोधात ‘जागरण गोंधळ’ आंदोलन; मुरळीचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

अफगाणिस्तानात भारतीय नागरिक अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट; आली ‘ही’ माहिती समोर

कौतुकास्पद! तरुणीने अपंगत्वावर मात करुन केला डान्स, पाहा व्हिडीओ

काय सांगता! कपाशीच्या पिकाला चक्क काकडी?, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More