बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अण्णा हजारे 7 वर्षांच्या कुंभकर्णीय झोपेतून खडबडून जागे झालेत”

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाटगे यांच्या जरंडेश्ववर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने ही कारवाई केली असल्याचं बोललं जात आहे. जरंडेश्ववर साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. याप्रकरणी अजित पवार यांचं देखील नाव समोर आलं आहे. या प्रकरणावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावरू आता काँग्रेसने टीका केली आहे.

आम्ही फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी काढले. अण्णा हजारे यांची निद्रावस्था भंग झाली नाही. राफेलच्या आवाजाने, शेतकऱ्यांच्या आक्रोशाने, महागाईच्या वणव्यानेही अण्णा ढिम्म हलले नाहीत, असा हल्लाबोल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. राज्यात सरकार बदलले व अण्णा 7 वर्षांच्या कुंभकर्णीय निद्रेतून खडबडून जागे झालेत, अशी टीका देखील सचिन सावंत यांनी केली आहे.

जरंडेश्वर प्रकरणात अजित पवार यांचं नाव आता आलं आहे. याविषयी आम्ही कधीपासून बोलत आहे. मात्र, मी फकीर माणूस. माझं कोण ऐकणार. आता ईडीने लक्ष घातलं आहे म्हटल्यावर सर्व बाहेर पडेल. आपल्या राज्यात सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात वाढली. त्याचंच अनुकरण देशाने केलं. परंतु सध्या हीच सहकार चळवळ मोडीत काढण्याचा डाव सुरू आहे, असा आरोप अण्णा हजारे यांनी केला होता.

दरम्यान, दिल्लीत शेतकरी आंदोलन शिखरावर असताना अण्णा हजारे उपोषणाला बसणार होते. परंतू त्याआधी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारेंची भेट घेऊन त्यांना उपोषण न करण्यासाठी त्यांचं मन वळवलं. तेव्हापासून अण्णा हजारे भाजपच्याच टीम मधले आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. याआधी अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व आहे. अशी टीका काँग्रसे नेते डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली होती.

थोडक्यात बातम्या-

आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट; 15 वर्षांचा संसार मोडला

समुद्राच्या मध्यभागी उडाला आगीचा भडका; आग विझवण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; महापौरांनी दिली ही महत्वाची माहिती

“भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”

‘दोन्ही डोसमुळे मृत्यूचा धोका 98 टक्क्यांपर्यंत कमी, तर एक डोसमधून…’; केंद्र सरकारची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More