अहमदनगर महाराष्ट्र

“शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार उदासीन असून ते शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे”

अहमदनगर | प्रजासत्ताकदिनादिवशी राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारावर ज्येष्ठ समाजसेवर अण्णा हजारेंनी आपली परखड अशी प्रतिक्रिया दिली आहे. या हिंसाचारावर बोलताना अण्णांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

दिल्लीत जे घडलं ते नक्कीच क्लेशदायक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपणच धुडगूस घालून आपल्या मालमत्तेची हानी करावी, हे फारच दुर्दैवी असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

मी 40 वर्षे आंदोलन करत आहे. आंदोलन म्हणजे सत्याग्रह. सत्याचा आग्रह हा शांततेच्या मार्गाने, अहिंसक मार्गाने करावा लागतो. हिंसेमुळे आंदोलन बदनाम होतं आणि गालबोट लागतं असल्याचं अणेणा म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार उदासीन असून ते शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे, असा आरोपही अण्णांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

आशिष शेलार भाजप आणि संघाचे गुलाम- अमोल मिटकरी

“शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?”

आधी शिवसेनेत आणि नंतर राष्ट्रवादीचा प्रचार, पाटील आता काँग्रेसमध्ये दाखल!

भारतातील ‘या’ शहरात पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या पार

“बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या