Anna Hazare | शिखर बँक घोटाळा प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी आणखी वाढल्याचं बोललं जात होतं. कारण या घोटाळ्या प्रकरणी (Shikhar Bank Scam Case) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत याचिका दाखल केल्याची बातमी होती. आता यावर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अण्णांनी क्लोजर रिपोर्ट याचिकांसदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते राळेगणसिद्धीमध्ये बोलत होते.
अण्णा हजारेंचा मोठा गौप्यस्फोट
याप्रकरणी माझा कुठलाही संबंध नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करुन काही लोक स्वार्थ साधत असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. मी कुठलीही याचिका दाखल केली नसल्याचं अण्णांनी म्हटलं.
अण्णा हजारे यांनी आक्षेप घेत निषेध याचिका दाखल करण्यासंदर्भात वेळ घेतला अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र, या संदर्भात माझा कुठलाही संबंध नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करुन काही लोक स्वार्थ साधत असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
या अर्जाचा आणि माझा कुठलाही संबंध नाही. या प्रकरणात कोणी काय केलं, मला माहित नाही. या याचिकेत माझंही नाव होतं. त्यामुळे अर्ज करण्याआधी मला विचारायला हवं होतं. परंतु, असं झालं नाही त्यामुळे हे चुकीचं असल्याचं मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे.
Anna Hazare | अजित पवारांना क्लीन चीट
शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणी अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासर इतर आरोपींना क्लीन चीट देण्यात आली आहे. तपासयंत्रणेने जानेवारी महिन्यात शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्ट जाहीर केला होता.
बँकेच्या कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीत अनियमितता असल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीमुळे बँकेला नुकसान झाल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याचं क्लोजर रिपोर्टमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; येणारे दोन दिवस..
मोठी बातमी! नितीश कुमारांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात केलं दाखल
“अयोध्यावासियांनी भाजपमुक्त राम करुन दाखवला”; उद्धव ठाकरेंनी डिवचलं
SBI ग्राहकांना सर्वात मोठा झटका; बँकेने घेतला मोठा निर्णय
अखेर मलायकाने प्रेग्नंसीबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली ‘या महिन्यात बाळाला….’