बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अण्णा हजारेंची तब्येत बिघडली, पुण्यातील रुग्णालयात दाखल

पुणे | महाराष्ट्राच्या मातीतील हिरा म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांना ओळखण्यात येतं. अण्णा हजारे म्हणजे महात्मा गांधींच्या विचारांना वाहून घेतलेलं एक मोठं नाव आहे. अण्णा हजारे आपल्या सामाजिक कार्यासाठी सर्वत्र परिचित आहेत. देशातील सर्वात मोठं जनआंदोलन उभारण्यात आण्णांचा मोठा हात होता. अशातच आता अण्णा हजारे यांच्या तब्येतीत ( Issue Of Health) बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे.

अण्णा हजारे यांना पुण्याच्या रूबी हाॅल रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अण्णांना ह्रद्यासंबंधी थोडासा त्रास जाणवत असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली आहे. अण्णांच्या तब्येतीवर डाॅक्टर विशेष लक्ष ठेवून आहेत. अण्णांच्या ह्रद्यात छोटे ब्लाॅकेज आढळुन आले आहेत. पण काळजी करण्यासारखं काही कारण नाही, असं रूबी रूग्णालयातील डाॅक्टरांनी सांगितलं आहे.

अण्णांच्या तब्येतीबाबात अधिक माहिती देताना डाॅक्टर म्हणाले की, अण्णांवर एंजीओेग्राफीसह काही तपासण्या करण्यात आल्या आहेत. आम्ही त्यांच्या ह्रद्यात काही ब्लाॅकेज पाहीले पण त्यावर ऑपरेशनची गरज नाही, असं रूबी रूग्णालयाचे प्रमुख डाॅक्टर परवेझ ग्रांट म्हणाले आहेत.

दरम्यान, अण्णा हजारे यांच्या तब्येतीची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली आहे. राज्यातील इतर मान्यवरांकडूनही अण्णांच्या तब्येतीची विचारपुस होत आहे. सर्वांकडून अण्णा लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या 

या वर्षी 180 टक्क्यांनी वाढला टाटांचा ‘हा’ शेअर, झुनझुनवालांचीही आहे गुंतवणूक

रहमानच्या मुलीच्या आवाजातही आहे जादू, पाहा दुबईतला खास व्हिडीओ

“विराट कोहलीला कायमचा डच्चू, रोहित नव्हे ‘या’ खेळाडूला करणार पूर्णवेळ कर्णधार”

आत्ताची सर्वात मोठी बातमी- परमबीर सिंह पुन्हा पदभार स्वीकारणार?

पोलिसांनी सुरु केलीय वसुली?, आमदारानं पोस्ट केला धक्कादायक व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More