हा नेता आहे वंचित बहुजन आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार!

हा नेता आहे वंचित बहुजन आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार!

औरंगाबाद |  प्रकाश आंबेडकर हेच वंचितचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी दिली आहे.

आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा आहे. विधानसभा निवडणुकीत जोमाने काम करून वंचितचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, असंही पाटील म्हणाले.

वंचित बहुजन आघाडी विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. वंचितला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून वंचितला विधानसभेसाठी सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक पातळीवर आम्ही चर्चा करतो आहोत. चर्चेअंती मार्ग नक्की निघेल, असं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात येत आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर मात्र अजूनही विधानसभेला आघाडीत जाणार की वेगळी चूल मांडणार, हे अद्याप अस्पष्ट आहे.

महत्वाच्या बातम्या-

-प्रमुख मार्गदर्शक असलेल्या शरद पवारांची ‘या’ पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे पाठ!

मुलाच्या भाजपप्रवेशाचं मधुकर पिचड यांच्याकडून समर्थन; म्हणतात…

-भाजपात प्रवेश करताना पिचड म्हणतात, मी पवारांचे उपकार कधीही फेडू शकत नाही!

-…म्हणून भाजपने जोरात इनकमिंग चालवलंय- सुशीलकुमार शिंदे

-“अडचणीचा काळ असला तर काय झालं, आम्ही साहेबांच्या सोबत आहोत”

Google+ Linkedin