अहमदनगर महाराष्ट्र

…तेव्हा तुमच्या मंत्र्यांना घरी पाठवलं हे विसरलात काय?- अण्णा हजारे

अहमदनगर | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतलं. यावरून शिवसेनेनं सामनाच्या आग्रलेखातून अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या, असा सवाल केला. याला अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते राळेगणसिद्धीत बोलत होते.

तुमच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला. तेव्हा तुम्ही भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत होतात, तेव्हाही मी आंदोलन केलं. त्यावेळी तुमचे मंत्री घरी गेले ना, विसरलात काय? असा सवाल अण्णा हजारेंनी शिवसेनेला केला आहे.

देशाच्या वेगवेगळ्या विषयावर मी आंदोलने केली. दिल्लीतील भाजपच्या केंद्र सरकारविरोधात 2014 पासून अनेक वेळा पत्रव्यवहार करून प्रश्‍न उपस्थित केले. या सरकार विरोधात आतापर्यंत माझी सहा आंदोलने झाली आहेत, असं अण्णा हजारे म्हणालेत.

आमच्या समोर भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस असं कोणीही नाही. आमच्यापुढे फक्त समाज आणि देश आहे, असं अण्णा हजारे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“कोरोना काळात तुकाराम मुंढेंनी चांगलं काम केलं”

किरीट सोमय्यांच्या मुलावर खंडणी उकळल्याचा आरोप!

जैश उल हिंद दहशतवादी संघटनेनं घेतली दिल्ली स्फोटाची जबाबदारी!

….तर म्हणाल अजित पवार काय भंगार बोलत होता- अजित पवार

सुधारणांवरुन वाद नको, पण व्यवस्था कमकुवत होऊ नये- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या