बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वातावरण फिरलं??? शिवसेनेचे माजी आमदार मुलासह राष्ट्रवादीत!

मुंबई |  काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करणार असताना शिवसेनेच्या माजी आमदाराने नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. औरंगाबादमधील गंगापूर-खुलताबाद विधानसभेचे दहा वर्ष शिवसेनेचे आमदार राहिलेले अण्णासाहेब माने आणि त्यांचे चिरंजीव संतोष माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

गंगापूर खुलताबाद विधानसभेची जागा भाजपाकडे गेल्यामुळे तिकीटासाठी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची चर्चा मराठवाड्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत माने पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अण्णासाहेब माने यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजपाच्या युतीच्या जागावाटपानंतर दोन्ही पक्षांमधील बंडखोरी समोर आली आहे. शिवसेनेकडून इच्छूक असलेले माने यांनी बंड पुकारत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

गंगापूर विधानसभा मतदारसंघ शिवसनेने भाजपाचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्यासाठी सोडल्याने शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी आहे.

माने पिता-पुत्रांच्या बंडामुळे मराठवाड्यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर-खुलताबाद मतदार संघातून राष्ट्रवादीकडून माने यांनी उमेदवारी जाहीर होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या-

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More