बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा समाजासाठी 3 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करा- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर | मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला 3 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात यावं, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आणि ओबीसींसाठी जाहीर केलेल्या सवलतीही लागू करा, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत शिक्षण व रोजगारासाठी सवलती मिळणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने राबवलेले जे ओबीसींना ते मराठ्यांना, हे सूत्र अंमलात आणावं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारने सातत्याने मराठा आरक्षणाबाबत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ताबडतोब राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन करून मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत पुन्हा सर्वेक्षण आणि अभ्यास सुरू केला पाहिजे. असा अहवाल आल्यानंतरच राष्ट्रीय मागासवर्ग आयोग व राष्ट्रपतींच्या मंजुरीने राज्याला पुन्हा कायदा करता येईल, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

तीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावं. त्यापैकी अण्णासाहेब पाटील महामंडळाला एक हजार कोटी रुपये द्यावेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करावी. सारथी संस्थेला पाचशे कोटी रुपये द्यावेत. मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थीनींची निम्मी फी भरण्यासाठी सहाशे कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे- अशोक चव्हाण

पुण्यातील भाजी विक्रेत्या आजीनं कोरोनाग्रस्तांना केली 1 लाखाची मदत!

काय सांगता! ओम, ओम म्हणत चितेवरच उठून बसला मृतदेह अन्….

“महाविकास आघाडी सरकारच्या मनात पाप, त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही”

येत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More