मुंबई | सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनाही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापन करुन जाहीर करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशाची चिंता लागून आहे.
शाळा, काॅलेजेस बंद असल्यानं विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत बरेच संभ्रम होत आहेत. मात्र आता अकरावीच्या प्रवेशाची तारीख जाहीर करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करु शकता. आता अकरावी प्रवेशासाठी 16 ऑगस्टपासून ऑनलाइन प्रवेश अर्ज घेता येणार आहे.
विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करता यावा यासाठी 13 ऑगस्टपर्यंत माॅक डेमोची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना फायनल अर्ज भरण्यासाठी काही अडचणी येऊ नये म्हणून ही माॅक डेमो अर्ज भरण्यात येणार आहे. सीईटी परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती अर्ज भरून अर्ज लाॅक करायचा आहे.
दरम्यान, हा अर्ज पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, अमरावती या सहा महापालिका क्षेत्रात अकरावीच्या प्रवेशासाठी ही अर्ज प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. https://11thadmission.org.in/ या वेबसाईटवर अर्ज भरता येणार आहे.
थोडक्यात बातम्या –
“लोकल सुरु करण्याबाबत दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही”
“कुठपर्यंत शांत बसायचं, शेवटी काही मर्यादा असतात, राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू शकतो”
देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट कायम; वाचा आजची आकडेवारी
शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; आता आणखी एका आरोपामुळे चर्चेत
दिल्लीत खलबतं सुरुच; देवेंद्र फडणवीस पुन्हा अमित शहांच्या भेटीला
Comments are closed.