देश

जिथे खिळे ठोकले, तिथे फुलं लावणार; राकेश टिकैत यांची घोषणा

Photo Credit- Facebook/Rakesh Tikait & Narendra Modi

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर रोडवर टोकदार खिळे ठोकले होते.

खिळे रोवल्याचे फोटो आणि व्हिडीओ संपूर्ण देशात व्हायरल झाले. त्यानंतर दिल्ली पोलिस आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. यानंतर हे खिळे काढण्यात आल्याची माहिती आहे.

दिल्ली पोलिसांनी खिळे ठोकलेल्या जागेवरच आम्ही फुलं लावणार असल्याची घोषणा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे.

गाझीपूर बॉर्डरवर ज्या ठिकाणी पोलिसांनी खिळे ठोकले होते. त्या ठिकाणी आपण फुलं लावणार आहोत आणि त्यासाठी 2 ट्रक माती मागवल्याचं राकेश टिकैत यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आमचं चुकलं असेल तर माफ करा, पण…- नितीन राऊत

‘गावी सोडलेले आजोबा परत आले’; राकेश टिकैत यांनी 92 वर्षीय शेतकऱ्याला खांद्यावर घेतलं उचलून

“फडणवीसांच्या काळात देशात पेट्रोल डिझेलची सर्वाधिक किंमत महाराष्ट्रात होती”

“मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की होतीये”

आपल्याला आपल्या कर्माची फळं मिळत असतात- पंकजा मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या