बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना रूग्णांना मोठा दिलासा; रेमडेसिवीर संदर्भात केंद्र सरकारने केली मोठी घोषणा

नवी दिल्ली | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडतोय. राज्यात सर्वच जिल्ह्यांत रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालाय. यामुळे कोरोना रूग्णांचे हाल होताना दिसत आहे. अशात एक दिलासादायक बातमी समोर आलीये.

सरकारने कोरोनाच्या उपचारात उपयुक्त असलेल्या रेमडेसिवीरच्या किमतीत सुमारे 50 टक्क्यांनी कपात केल्याची माहिती आहे. देशात रेमडेसिवीरचे सात उत्पादक असून, त्यांची क्षमता दरमहा सुमारे 38.80 लाख युनिट आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार औषध निर्मिती विभाग देशातील उत्पादकांच्या संपर्कात असून औषधाचे उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नात आहे, असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटलं आहे.

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. मंत्री नवाब मलिकांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आधी ट्विट करून आणि नंतर माध्यमांसमोर येऊन सरकारवर आरोप केलेत आहेत.

महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावर नवाब मलिकांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी असं खुलं चॅलेंज भाजपने दिलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“कुंभमेळ्याहून परतणारे भाविक प्रसाद म्हणून कोरोना घेऊन येतील”

प्रेयसीच्या प्रेमात वेडा झाला प्रियकर, केले अत्यंत धक्कादायक कारनामे

15 दिवसात होत्याचं नव्हतं झालं; पुुण्यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा कोरोनाने मृत्यू

महाराष्ट्राकडून मी तुम्हाला विनंती करतो, राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा करा- जितेंद्र आव्हाड

…म्हणून मुलीनंच घरच्यांच्या जेवणात मिसळलं विष; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More