महाराष्ट्र मुंबई

सायरस पुनावालांची मोठी घोषणा; आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

मुंबई | सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाखांची मदत ‘सीरम इन्स्टिट्यूट’कडून जाहीर करण्यात आली आहे.

सीरम इन्स्टिट्यूटसाठी आजचा दिवस अतिशय दु:खद आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असं सीरमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांनी म्हटलं आहे.

कंपनीच्या निर्धारित नियमांच्या पलिकडे जाऊन दुर्घटनेतील मृत्यूमुखींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर करत आहोत, असंही पुनावाला म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार!

सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला लागलेली आग पुन्हा भडकली!

भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी आरोग्य विभागाने केली ‘ही’ मोठी कारवाई!

“सीरमच्या इमारतीला आग लागली की लावली?, या घटनेची चौकशी झाली पाहिजे”

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचे मृतदेह सापडलेत- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या