बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संतापजनक! इन्स्टाग्राम स्टिकरमध्ये शिवशंकरांच्या हातात वाईनचा ग्लास, इन्स्टाग्रामविरूद्ध तक्रार दाखल

नवी दिल्ली | सोशल मीडियामध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं अॅप म्हणजे इन्स्टाग्राम. मोठ्या प्रमाणात लोक हे अॅप वापरत असल्यामुळे या अॅपमध्ये वेगवेगळे अपडेट्स येतात. सध्या शिवशंकर देवाच्या भक्तीचे अनेक व्हिडीओ, फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात येतात. यावरुनच इन्स्टाग्रामवर शिवशंकराचे काही स्टिकर्स देखील अपडेट करण्यात आले आहेत. मात्र यावरुन इन्स्टाग्रामविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

भाजप नेते मनीष सिंह यांनी दिल्लीच्या पार्लमेंट स्ट्रिट पोलीस ठाण्यात इन्स्टाग्रामचे सीईओ आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. इन्स्टाग्राम स्टिकर्समध्ये शिव हा शब्द टाकल्यानंतर शंकर देवाचे काही स्टिकर्स दिसतात. यामध्येच एक स्टिकर आहे, ज्यात शंकर देवाच्या एका हातात वाईनचा ग्लास तर दुसऱ्या हातात मोबाईल असलेला दिसून येते.

या स्टिकर्सचे फोटो देखील मनीष सिंह यांनी शेअर केले आहेत. काही दिवसांपुर्वी इन्स्टाग्राम बॅन होण्याच्या मार्गावर होतं. ते प्रकरण कमी होण्याच्या मार्गातच पुन्हा एकदा या प्रकाराने इन्स्टाग्रामला धक्का बसू शकतो. देशात मोठ्या प्रमाणात युझर्स इन्स्टाग्राम वापरत आहेत. असातच जर इन्स्टा बॅन झालं तर गुगलला मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो.

दरम्यान, अलीकडे इन्स्टाग्राम सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वादाचा विषय ठरत आहे. काही दिवसांपुर्वी सर्वात खराब भाषा म्हणून सर्च केल्यास कन्नड भाषा दाखवण्यात येत होतं. यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर गुगलने जाहीर माफी मागत गैरसमज आणि भावना दुखावल्यामुळे कंपनी दिलगीर आहे, असं म्हटलं जाते.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढली; मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी समाजाचा राज्यव्यापी मोर्चा

वेल डन छेत्री! दिग्गज मेस्सीला मागे टाकत भारतीय सुनिल छेत्रीची दुसऱ्या स्थानी झेप

मंडपात नवऱ्याला बघताच नवरीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

कोरोनामुळे ‘या’ महापालिकेतील तब्बल 19 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

 हाय अलर्ट! ‘या’ जिल्ह्याला हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा; पुढचे 2 दिवस धोक्याचे

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More