बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संतापजनक! मुलाकडून जन्मदात्या आई-वडिलांना बेदम मारहाण, आईचा मृत्यू अन्….

बीड | आज जगभरात ‘फादर्स डे’ साजरा करण्यात येतोय. आपल्या आयुष्यातील सगळ्यात पहिले हिरो बनलेल्या आपल्या वडिलांसाठी असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस. प्रत्येकाच्याच आयुष्यात त्यांच्या वडिलांची एक वेगळी भूमिका असते. फादर्स डे निमित्त सर्वचजण आपल्या वडिलांसाठी स्पेशल दिवस बनवता यावा म्हणून प्रयत्न करतात. अशातच बीडमधील घाटशिळ पारगाव येथे मुलाकडून आपल्या आई-वडिलांना काठीने बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

त्र्यंबक खेडकर आणि शिवबाई खेडकर हे गावातच राहतात. त्यांना बाबासाहेब नावाचा मुलगा आहे. तो मानसिक रोगी असल्याचं कळतंय. काल सायंकाळी या मुलानं आई-वडिलांना अमानुष मारहाण केली. रात्री त्यांना अहमदनगर येथीव रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान वृद्ध आईचा मृत्यू झाला तर वडील कोमात आहेत.

मानसिक रुग्ण असलेल्या मुलाने काठी आणि दगडाने वयोवृद्ध पालकांना अमानुष मारहाण केली. दुर्दैवं म्हणजे वृद्ध दाम्पत्य मदतीसाठी याचना करत होते पण त्यांना वाचवण्याऐवजी गावातील रहिवासी मारहाणीचा व्हिडीओ काढण्यात दंग होते.

दरम्यान, बाबासाहेब खेडकर हा चक्क काठीने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना सतत मारहाण करत होता, असं काही ग्रामस्थांनी सांगितलं. त्याला मारहाण करताना थांबवण्यासाठी गेलेल्या लोकांना देखील शिव्या आणि मारहाण करत होता म्हणून लोकं तिकडे जात नव्हते. या संदर्भात बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांना विचारलं असता ते म्हणाले की, ‘व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. हा प्रकार संतापजनक आहे.’

 

थोडक्यात बातम्या – 

‘उद्धवजी, भाजपसोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल’; ‘या’ शिवसेना आमदाराच्या पत्रानं खळबळ

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पिंपरी-चिंचवडची तहान भागवणारं ‘हे’ धरण 33.26 टक्के भरलं

एक दिवस दिलासा देऊन पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ

मराठा आरक्षणसंदर्भातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल; न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्याचा कोरोनामुक्तीचा दर 97.90 टक्क्यांवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More